दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा

शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस निमित्ताने श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना पाटेठान दौंड येथील ऊसतोड कामगारांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.


शेतकरी,कष्टकरी,ऊसतोड कामगार,सहकार चळवळीच्या विविध प्रश्नांवर दैनिक पुढारीने सातत्याने आवाज उठविला आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर डॉ.प्रतापसिंह जाधव यांनी कायम आग्रही भुमिका घेत न्याय दिलेला आहे.त्यांचा ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार श्री ऊत्तम किसन ठाकरे व सौ गिताबाई ऊत्तम ठाकरे वडेगाव ता नांदगांव जि नाशिक या दांपत्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.


शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.मौजे पाटेठान येथील शेतकरी तानाजी मेमाने,श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे ऊसतोड कामगार तसेच अनुराज शुगरचे शेतकी अधिकारी सुहास परांडे,संघटनेचे कामगार आघाडी अध्यक्ष हिरामण बांदल,दौंड तालुका अध्यक्ष शरद केशव हंबीर व ऊसतोड कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.



यावेळी केक,साखर व १पोते बासमती तांदुळ,कोविड १९ प्रतिबंधक गोळ्या,आयुर्वेदिक आल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले.