प्रभाग क्र ३० मध्ये पदवीधर मतदान नोंदणी अभियानाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन

प्रभाग क्र.३०मध्ये रविवारी भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते पदवीधर मतदार नोंदणी अभियानचे उदघाटन करण्यात आले.



यावेळी मा.राजेश पांडे पदवीधर नोंदणी प्रमुख,पश्चिम महाराष्ट्र,पर्वती विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.माधुरीताई मिसाळ,महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष मा.उमा खापरे भा.ज.पा महिला शहर अध्यक्ष मा.अर्चना पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक मा.रविंद्रजी अनासपुरे,नगरसेवक तथा पी.एम.पी.एम.एल चे संचालक मा.शंकर गणपत पवार,सामाजिक कार्यकर्ते मा.तुकाराम कुंडलिक पवार,नगरसेवक दिपक पोटे,माजी नगरसेवक मा.दत्ता खाडे,नगरसेवक राजेश येनपुरे,पर्वती मतदारसंघ अध्यक्ष मा.जितेद्र पोळेकर,भा.ज.पा,पुणे शहर चिटणीस मा.विश्वास ननावरे,महिला आघाडी पर्वती मा.विनया बहुलिकर,प्रभाग क्र ३० अध्यक्ष मा.सुजीत सामदेकर,उत्सव प्रमुख कसबा विधानसभा मतदार संघाचे मा.सतीश मोहोळ आदि मान्यवर उपस्थित होते.या अभियाना अंतर्गत ३०० पदवीधर मतदारांची नोंदणी झाली.तसेच सर्व सोसायटीधारकांनी पदवीधर नाव नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.