औरंगाबाद येथे रोशनी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे रविवारी लाईव बक्षिस वितरण सोहळा पार पडला यात करमाळा तालुक्यातील चौथी पास निर्माता लेखक दिग्दर्शक महादेव सुभाष मांढरे व अलका फिल्म पुणे निर्मित लागन करोनाची या लघुपटास द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळाले.लागन करोनाची या लघुपटामध्ये लाॅकडाऊन मधील सामान्य कुटुंबातील व्यथा मांडुन लाॅकडाऊन मध्ये आपण कोणती काळजी घ्यावी याचे महादेव मांढरे यानी मोबाईलद्वारे चित्रकरण करुन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.या आंतरराष्ट्रीय महोत्सवामधे देशविदेशातून ६५४ फिल्म सहभागी झाले होते.लागन करोनाची या लघुपटाने आतापर्यत विविध राज्यातून अनेक बक्षिसे प्राप्त केले.
औरंगाबाद येथे रोशनी आंतरराष्ट्रीय लघुपटाचे बक्षिस वितरण सोहळ्याचे आयोजक तुषार थोरात सागर जाधव, सतिष मेटे -उदयोजक,सुभाष तायडे पाटिल, लेखक अरुण गरड मराठी चित्रपट निर्माते बाबासाहेब मोराळकर,संस्थापक संस्कृति गोबल इंग्लिश स्कुल सतिष तायडे,मुख्याध्यापक यांनी सन्मानचिन्ह देवुन महादेव सुभाष मांढरे याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या पुरस्कारबद्दल करमाळा तालुक्यातील हरिदास काळे सर, निळ सर,जावळे सर,संतोष कांबळे ,सुभाष पाटील,राहुल मांढरे,कैलास कदम,बशिर तांबोळे,महादेव धोडे,पोपट मांढरे, संदेश पाटील,काका हानपुडे,आशोक हानपुडे,चंदु आंबारे, विजय खंडागळे,आण्णा सपकाळ,इत्यादी मान्यवरांकडून, पंचक्रोशीतून,मिञ परिवार यांच्याकडून मांढरे यांचे कौतुक होत आहे.