सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रहिवासी असलेले महादेव मांढरे यांनी कोरोना या जागतिक महामारीच्या विषयावर 'लागण कोरोनाची 'या लघुपटाची निर्मिती केली.महादेव मांढरे यांचे शिक्षण अवघे चौथी पर्यंतचे त्यांना बालपणापासूनच अभिनय क्षेञाची आवड असल्याने अभिनेता ते दिग्दर्शक असा प्रवास केला.त्यांनी अलका फिल्म पुणे प्रोडक्शनच्या माध्यमातून जागतिक संदेश देणारा 'लागन कोरोनाची 'या लघुपटाची निर्मिती केली.त्यांच्या या लघुपटाची औरंगाबाद येथील रोशनी इटरनॅशनल शाॅट फिल्म फेस्टिवल,बिहार राज्यातील नंवाद,पश्चिम बंगाल आणि कोलकता येथील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये कार्यालयीन स्किनिंगसाठी निवड करण्यात आली.यामुळे महादेव मांढरे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माता,दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली.सर्वानी 'लागन कोरोनाची 'हा लघुपट यु ट्युबवर जाऊन पहावे असे आवाहन केले.
आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल स्किनिंगसाठी 'लागन कोरोनाची 'लघुपटाची निवड